तु प्राणच का नाही घेतला

दोन शब्दात बोललीस तु सार काही संपल

कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने जगच माझ लुटल

रचत बसलो स्वप्न स्वताला फसवत फसवत

कसे समजावू मनाला स्वप्न आता ते तुटल
दोन शब्दात बोललीस तु सार काही संपल


टव टवित प्रीत फुल माझे क्षनामध्ये आचानक सुकल
जगविल होत ज्याला मी आयुष्याची किंमत मोजुन
त्यानेच सांगितले आज आसतित्व माझे मिटल

दोन शब्दात बोललीस तु सार काही संपल
नाही दोष तुला देणार तुझे तर सारेच मी मानल

तुझा प्रत्येक आश्रू पुसन्यासाठी रक्त ही माझे सांडल
कसे सांगू हे बोलण्यापेक्ष्या तु प्राणच का नाही घेतल ?
Previous Post Next Post