फ़क्त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्त तुझ्यासाठी हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी
ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन कधी श्वास गुदमरला होता फ़क्त तुझ्यासाठी
आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्त तुझ्यासाठी

 तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्त तुझ्यासाठी
तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी हा किनारा झरला होता फ़क्त तुझ्यासाठी
आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्त तुझ्यासाठी
फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा तो मी शब्दात कोरला होता फ़क्त तुझ्यासाठी....
Previous Post Next Post