अखेर मी जिंकलो

"अखेर मी जिंकलो..."

हॉलचा दरवाजा ढकलून मी विचारलं,
"मे आय कम इन सर?

"येस'

"Good Morning Sir, Good Morning Madam.'

परवानगीनंतर मी बसलो. माझी मराठीतील उत्तरे पॅनेलला इंग्रजीतून सांगण्यासाठी कुलकर्णी मॅडम माझ्या शेजारीच बसल्या होत्या. घोड्याच्या नालाच्या आकाराचा पॅनेलसमोरचा टेबल होता व माझी खुर्ची त्यांच्यापासून थोड्या अंतरावर होती. मी त्यांना नखशिखांत दिसत होतो. माझ्या पायाची, बोटांची चलबिचल त्यांना जाणवत होती.

सुरेंद्रनाथ यांनी विचारले,""Vishw as, you have opted, Marathi medium, why don't you speak in English. There would be direct communication between you&us'

मी अडखळत उत्तरलो"सर, मी ग्रामीण भागातला आहे. माझे इंग्रजी बोलणे जेमतेम आहे. मी मराठीत चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकेन.''
कुलकर्णी मॅडमने त्यांना याचा सार इंग्रजीत सांगितला.

"No issue Vishwas, you can speak in broken English.``
"OK Sir, I'll try my best'म्हणून मी सुरवात केली.
त्यांनी मला पदवीधर झाल्यापासून तीन वर्षे काय करतो आहेस? असं विचारलं.

मी इंग्रजीतून फाडफाड उत्तर दिलं.
"Sir, I have established one `Study Center'at my village which works for the upliftment of the rural youths as well as for dissiminating rational and viable ideas in rural folks!

जनरल सुरेंद्रनाथ हसले व म्हणाले, Vishwas, you speak good English. (मी तेवढेच उत्तर पाठ करून ठेवले होते.) माझं खरं इंग्रजी पुढं सुरू झाले.

दुसरा प्रश्‍न त्यांनी"घाशीराम कोतवाल'नाटकाबद् दल विचारला. ते वादग्रस्त का झाले, याचं समालोचन करताना मला स्त्रीलंपट या शब्दाला इंग्रजी शब्द सापडला नव्हता.
मी behind woman म्हणून सांगितलं; ते कुलकर्णी मॅडमनी Womeniser असे सुधारून घेतले. अशी गचके घेत मुलाखत सुरू झाली.

मला त्यांनी माझ्या Area of Interest बद्दल विचारले. मला"ग्रामीण भागातील युवकांचे संघटन व जनजागृती'हा विषय दिला होता. मी खेड्यातच मोठा झाल्यामुळे खेड्यातील प्रश्‍नांची जाण होती.
अण्णा हजारे त्या वेळी"न्यूज'मध्य े होते. मी राळेगणसिद्धीला आठ दिवस राहून आलो होतो. अण्णांनी घडवून आणलेली कुऱ्हाडबंदी, चराईबंदी व श्रमदानाची पंचसूत्री यांची माहिती सांगितली. जसे प्रश्‍न आले, त्यांच्या उपप्रश्‍नाकडे पॅनेलला वळवू शकलो.
जमेल तशी वस्तुनिष्ठ उत्तरे मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून दिली. प्रामाणिकपणा सोडला नाही.

शेवटचा प्रश्‍न मला चकित करणारा होता. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी हिंदीत विचारले,""विश्‍ वास, इस दुनियामें तुम क्‍यों आए हो?''

मी क्षणभर गोंधळलो. मी माझ्या भूतकाळाकडं पाहिले आणि माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या कवितेच्या ओळी मी पॅनेलची परवानगी घेऊन उत्तरलो.
To fight the impossible dream
To fight the unbeatable foe
To bear the unbearable sorrow
To run where the brave dare not go
To right the unrightable wrong
To love pure and chaste from afar
To try when your arms are too weary
To reach the unreachable star
This my quest
To follow that star
No matter how hopeless
No matter how far
To fight for the right
Without question or pause
To be willing to march into hell
For a heavenly cause

"सर मी या जगात संघर्ष करण्यासाठी आलो आहे. हा संघर्ष करताना मला कोणताही थांबा घ्यायचा नाही. कोणताही प्रश्‍न विचारायचा नाही,''असा शेवट मी केला.

माझ्या या"फाइट फॉर राइट'चा योग्य परिणाम झाला. मला मुलाखतीत 300 पैकी 210 गुण मिळाले आणि माझी"आयपीएस'मध् ये निवड झाली.

माझा एक संघर्ष संपला; पण दुसरा संघर्ष सुरू झाला होता..
Previous Post Next Post