कधीतरी

कधीतरी अशीच एक
संध्याकाळ असेल कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...



कधीतरी मग या मनालाही समजेल,तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल..
Previous Post Next Post