डोळ्यात तुझ्या पाहू दे

तोतिलाम्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” तीम्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे”
तोम्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केलातर?” तीम्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”
“ठीक आहे मग दुपारीफिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायचीतीच वेळ”
“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू” “नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”
“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट” “बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”
आतामात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़कीआडून
दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना सुरवात नक्की करावी कुठूनदोघांनाहीकळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली अमृतांजन चीबाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला “रागावलास न माझ्यावर?” आणितो विरघळला।
“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग तीम्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”
“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल छोट्या मोठ्यागोष्टींसाठीजीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझतू किती सहज पेललस सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाहीकावाटत कधीमोकळ मोकळ व्हावसं झटकूनसगळीओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”
“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास… माप ओलांडून आले होते, तेव्हाच माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?
Previous Post Next Post